वनविभागाच्या सुसज्ज जलद बचाव पथकाची स्थापना !

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 05:59 AM
views 166  views

सावंतवाडी : सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्षाची परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज जलद बचाव पथक ची स्थापना करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या शुभहस्ते याचा प्रारंभ करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी  मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात. तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्यावतीने  उपवनसंरक्षक  नवकिशोर रेड्डी यांच्या शुभहस्ते व   सहा. वनसंरक्षक सुनील लाड व  परिविक्षाधीन सहा. वनसंरक्षक  नेहा वानरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथका ची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व वनक्षेत्रपाल कुंभार तसेच इतर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वन्यप्राणी बचाव करण्याबरोबरच या पथकाच्या मार्फत मनुष्यवस्ती नजिक वन्यप्राणी यांच्या उपद्रव असणाऱ्या क्षेत्रात RRT टीम मार्फत पिंजरे लावून वन्यप्राणी विशेषत माकड ,वानर यांना पकडून त्यांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. मनुष्यवस्तीत  वन्यप्राणी आढळल्यास तसेच माकड वानर यांचा उपद्रव असणाऱ्या भागातील नागरिकांना या बाबतची माहिती तात्काळ विभागीय कार्यालय येथील RRT कंट्रोल रूम ला हेल्पलाइन क्रमांक  +91 2363-272005 देण्यात यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीने केलय.