
कुडाळ : वारंगांची तुळसुली येथील शंकर अनंत तूळसुलकर (६०) हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घडली.
यातील शंकर अनंत तुळसुलकर हे २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता घरातून कुठेतरी निघून गेले होते. नेहमीप्रमाणे ते परत येतील असे घरातील व्यक्तींना वाटले होते. मात्र यानंतर ते घरी परत आलेच नाहीत. नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेऊनही अद्यापपर्यंत त्यांची काहीच माहिती न मिळाल्याने त्यांचा मुलगा मनोज शंकर तुळसुलकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात आपले वडील बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे.अशी माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.