वैभववाडी बस स्थानक सर्व सुविधांनी सुसज्ज करा | ग्राहक पंचायतीची निवेदनाद्वारे मागणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 13, 2023 15:27 PM
views 134  views

वैभववाडी : तालुक्यातील बसस्थानकात अनेक सुविधांची वानवा आहे.या सुविधा नविन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पुर्ण कराव्यात अशी मागणी ग्राहक पंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील बसस्थानकातील अपु-या सुविधाबाबत ग्राहक पंचायतीने महामंडळाचे लक्ष वेधले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मे महीना सुट्टी संपून आता नवीन शैक्षणिक वर्ष येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी हे एकमेव साधन आहे.शेकडो विद्यार्थी या बसने प्रवास करत असतात. नवीन वर्षात विद्यार्थी वेळेत शाळेत उपस्थित राहावेत या दृष्टीने एस.टी च्या  फेऱ्यांचे योग्य ते नियोजन केले जावे.तसेच  दि.१५ जुन पासून मानव विकास अंतर्गत असलेल्या सर्व एस.टी बस फेऱ्या सुरू कराव्यात.बसस्थानक परिसराचे डांबरीकरण व्हावे.

पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालयाची सुविधा निर्माण करावी.पुर्णवेळ वाहतूक नियंत्रक उपलब्ध व्हावेत. अशा मागण्या  ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने .विभाग नियंत्रक,

रा. प. सिंधुदुर्ग विभाग, कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी ग्राहक पंचायत शाखा वैभववाडी तालुकाध्यक्ष तेजस साळुंखे, उपाध्यक्ष इंद्रजित परबते, सहसंघटक महिला संपती चौगुले, सचिव विवेक मालवणकर, कोषाध्यक्ष सचिन सावंत, सल्लागार एस.पी.परब., आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.