
रत्नागिरी : इपीएफ पेन्शनर संघाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी मंगळवारी दुपारी शाहू पुतळ्याशेजारील भविष्य निवृत्त निधीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पेन्शनधारक या मोर्चात सहभागी झाले होते.
अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात पेन्शनधारकांनी हातात फलक घेऊन विविध मागण्या मांडत घोषणा दिल्या. पेन्शनमध्ये वाढ, जुनी पेन्शन योजना लागू करणे, महागाई भत्ता देणे, पेन्शन धारकांसाठी आरोग्य सुविधा देणे, या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
प्रा. राज बोथरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून या मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पेन्शनधारक सहभागी झाले होते.या मोर्चामुळे प्रा.राज बोथरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची चळवळ उभी करणार असून लवकरच तालुका..तालुका स्तरावर राज्याचे मार्गदर्शक बोलून सभेचे आयोजन करण्यात येईल असे पदधिकारी यांच्या समोर ग्वाही दिली..
दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राज्य स्तरावरील नेत्यांनी सरकारला इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात उपस्थित पेन्शनधारकांनी पेन्शन वाढीबरोबरच आरोग्य सेवा सुधारणा, महागाई भत्ता आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर संघर्ष तीव्र केला जाईल, असे पेन्शनधारकांनी सांगितले. मोर्चाचे नेतृत्व अतुल दिघे , राज बोथरे , बाळकृष्ण कुलकर्णी, शांताराम पाटील, प्रकाश काळे, गोपाळ पाटील, महादेव दशिंगे, भाऊसाहेब यादव, प्रमोद परमाणे, सुजित शेळ, राजेंद्र बारस्कर इत्यादींनी केले.