
वेंगुर्ले : येथील शिवसेना कार्यालयात आज शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी मठ गावातील उबाठा शिवसेनेच्या ३५ महिलांनी मठ गावच्या माजी ग्रामपंचयात सदस्य ययाती नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक अँङ निता सावंत-कविटकर, उपजिल्हा संघटक शितल साळगांवकर व तालुका महिला संघटक दिशा शेटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मठ येथील अनिता कडुलकर, प्रमिला मोबारकर, वैशाली ठाकूर रसिका कोचरेकर, सुमित्रा आईर, जयश्री आईर, माधुरी आईर, उज्वला आईर, पल्लवी आईर, प्रतीक्षा नाईक, संगीता नाईक, योगिता कडुलकर यांच्यासहित इतर महिला तर आडेली येथील सुनीता धुरी, जिजाबाई धुरी, वैशाली होडावडेकर, सुचिता धुरी, विद्या धुरी, माधुरी होडावडेकर, सत्यवती धुरी, मधुमती धुरी, ज्योती सावंत, संगीता नाईक (वेतोरे) आदी महिलांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी महिला जिल्हा संघटक अँङ निता सावंत- कीबटकर, उपजिल्हा संघटक शितल साळगांवकर, तालुका महिला संघटक दिशा शेटकर, शहर महिला संघटक अँङ श्रध्दा बावीस्कर, शिवसेनेच. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, तालुका युवक प्रमुख स्वप्नील गावडे, आडेली विभाग प्रमुख मितेश परब, मनाली परब आदी मान्यवर उपस्थित होते.