विजयदुर्ग आगार कामगारांचा सेवा शक्ती संघर्ष संघटनेत प्रवेश..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 08, 2023 13:59 PM
views 85  views

देवगड : विजयदुर्ग आगारात भाजपचे आ. नितेश राणे यांच्या नेत्रुत्वाखाली भाजपप्रणित सेवा शक्ति संघर्ष संघटनेचे विभागीय अध्यक्ष .संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते अशोक राणे या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जाहीरप्रवेश आणि आगार कार्यकारणी 

सभा पार पडली त्याआधी प्रथम विजयदुर्ग गावचे ग्रामदैवत श्री.देव रामेश्वर देवाच्या दर्शनाने आणि विजयदुर्ग आगारातील श्री.गणेशाच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला, त्यानंतर सभेचे अध्यक्षपद .संदेश सावंत यांनी स्विकारावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. आणि कामकाजाला सुरुवात झाली. प्रथम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कामगार नेते अशोक राणे, विभागिय कार्याध्यक्ष दाजी भाट, तसेच विजयदुर्ग मतदार संघाचे विभाग प्रमुख अरीफ बगदादी, विजयदुर्ग गावचे विद्यमान सरपंच काझी ,माजी सरपंच प्रसाद देवधर, माजी सरपंच महेश बिडये,सामाजिक कार्यकर्ते ग्रेसीस फर्नांडिस,प्रदिप साखरकर,तसेच देवगड आगारातील साई ओटवकर,संकेत फोंडेकर, विद्या सावंत, कुडाळ आगारातील प्रशांत गावडे,समिर कदम, वेंगुर्ला आगारातुन भरत चव्हाण,दाजी तळवडेकर, भाऊ सावळ , प्रकाश मोहिते पाटील, आणि कणकवली आगारातुन मनोजकुमार पवार,उमेश बोभाटे,कुशल कदम ,उदय मसुरकर,प्रकाश वालावलकर, विराज पोईपकर,गुरु सामंत हे आवर्जुन उपस्थिती होते.विविध मान्यवरांनी एसटीच्या सुरक्षित भवितव्याविषयी आणि कामगार न्याय हक्क व कर्तव्यांची माहिती दिली. आणि आपल्या जबाबदारी विषयी अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर विजयदुर्ग आगारातील जेष्ठ वाहतुक नियंत्रक आताच सेवानिवृत्त झालेले आणि सेवा शक्तिचे आगार सल्लागार विजयकुमार राणे यांचा संदेश सावंत यांच्याशुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सर्वश्री,रोहन शिंदे, शैलेंद्र परब,राहुल मणचेकर,विजय राणे,शंकर शेळके, बंडु कोकरे, श्रीधर गिरकर,संदीप सावंत, प्रविण भोसले,मंगेश कोकरे,राजेंद्र कोकरे, संजय कोकरे, अंकुश काळे,ज्ञानेश्वर नार्वेकर,जयदिप शिर्सेकर, राजेंद्र कदम,संतोष देवरुखकर,सुर्यकांत शेळके,प्रमोद घाडी,प्रविण तांबे,रामभाऊ खुडकर, महेंद्र पवार,दिपक महाजन,लहु पवार, हनुमंत तपघाले,धम्मचक्र भिसे,सी आर आत्राम, सुहास वेदरकर, या कर्मचार्यांनी जाहीर प्रवेश केला. त्यानंतर सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या नामफलकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले. व विजयदुर्ग आगारप्रमुख यांची सदिच्छा भेट घेऊन डेपो कार्यकारिणी सादर केली. तसेच सर्वांनी विभागिय अध्यक्ष श्री. सावंत आणि.अशोक राणे यांचे समवेत स्नेहभोजन करून कार्यक्रमाचे यावेळी समापन करण्यात आले.