
वैभववाडी: मुंबई पोलीस दलात नियुक्ती झालेल्या ऐनारी गावच्या कु.प्राजक्ता श्रीकृष्ण विचारे यांच उद्योजक सुनील नारकर यांनी अभिनंदन केले.तिच्या घरी जाऊन तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऐनारी गावचे पोलीस पाटील श्रीकृष्ण विचारे यांची मुलगी मुंबईत नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीसाठी उतरली होती.या भरतीत तिने मैदानीसह लेखीपरीक्षेत उत्तीर्ण होत आपली निवड पक्की केली.ग्रामीण भागात शिकून मुंबई पोलीस भरतीत निवड झालेल्या प्राजक्ताच श्री नारकर यांनी कौतुक केले.तिच्या घरी जाऊन तिचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुंबईत कोणतीही अडचण भासल्यास हक्काने संपर्क साधा.तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असा विश्वास त्यांनी विचारे कुटुंबीयांना दिला.