उद्योजक शैलेश पै यांचा सत्कार

पतंजली योग समिती परिवाराचा पुढाकार
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 09, 2022 17:00 PM
views 306  views

सावंतवाडी : पतंजली योग समिती परिवारतर्फे येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या विशेष मेळाव्यात मानवतेचे उपासक यशस्वी उद्योजक शैलेश पै यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष महेश भाट, किसान प्रभारी प्रा. सुभाष गोवेकर, समन्वयक विकास गोवेकर, तालुका प्रभारी दत्तात्रय निखार्गे, युवा प्रभारी विद्याधर पाटणकर, मीडिया प्रभारी रावजी परब, भरत गावडे, रामनाथ सावंत, प्रकाश रेडकर उपस्थित होते. पतंजलीतर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन पै यांना सन्मानित केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना पै यांनी सर्व टीममुळे आणि सहकाऱ्यांमुळे चांगले कार्य घडले, असे सांगून पतंजलीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. भरत गावडे यांनी आभार मानले.