
देवगड : देवगड येथील गुजराती नवरात्र मंडळ आणि सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला व या शिबिराला 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कांतीभाई पटेल यांनी केले.
यावेळी सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिराचंद तानवडे,सचिव प्रकाश जाधव,विजयकुमार जोशी,रविकांत चांदोस्कर,प्रवीण जोग तसेच हरिभाई पटेल,हिरालाल पटेल,रमनभाई पटेल,मोहनभाई पटेल,लहेरीकांत पटेल,युवक अध्यक्ष भावेश पटेल,सचिव वसंत पटेल,हेल्थ डिपार्टमेंट जिगर पटेल तसेच यावेळी डॉ. मोहन बिडगर,श्रीमती प्रांजली परब,श्रीमती,रुबिना शरीक मसलत,श्रीमती नेहा परब,श्री नंदकुमार आडकर,श्री सुरेश डोंगरे,श्री नितिन गावकर यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी गुजराती युवक बांधवांनी आप आपली जबाबदार यशस्वी रित्या पार पाडली.