फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2024 09:39 AM
views 265  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार्मासिस्टसाठी आयोजित करण्यात आलेल्या फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२८ फार्मासिस्ट उपस्थित होते. यात महिला फार्मासिस्टची उपस्थिती लक्षणीय होती. मालवण तालुक्यातील कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या फार्मासिस्ट रिफ्रेश कोर्सच्या उद्दघाटन प्रसंगी व्यासपीठावर नवी मुंबई केमिस्ट असोसिएशन सेक्रेटरी सुनील छाजेड, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल कार्यकारणी सदस्य नितीन मणीयार, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, संघटन सचिव काशिनाथ तारी  खजिनदार  विवेक आपटे, प्रवीण नाईक, चंद्रशेखर सुपल, ललित ढोलम, दयानंद बांदेकर, ओमकार मांजरेकर, विद्यानंद परब, वीरेश येसजी, अमेय पारकर दत्तात्रय पारधीये आदी उपस्थित होते.

औषध व्यवसायात वेगाने होणारे बदल, ड्रग अँड कॉस्मेटिकमध्ये होऊ घातलेले नविन बदल तसेच व्यवसायात येणाऱ्या भविष्यातील स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्येक फार्मासिस्टने आपले ज्ञान अद्यावत ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी पर्यायाने भविष्यात आपल्या व्यवसायात येणाऱ्या स्पर्धेला आणि व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला फार्मसीस्ट सक्षम व्हावा व्हावा. तसेच यापुढे फार्मासिस्टसाठी अनिवार्य असलेले फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल कार्ड करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल प्रत्येक फार्मासिस्टसाठी असे रिफ्रेशर व फार्मासिस्ट कौन्सिलिंग कोर्स करणे बंधनकारक करणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार्मासिस्टसाठी रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले होते.या रिफ्रेशर कोर्समध्ये प्रामुख्याने डॉ रोहन बारसे यांनी अँटीबायोटिक रेजिस्टन्स, सत्यजित साठे यांनी इसेन्शियल ऑफ ड्रग्स स्टोरेज, भूषण माळी यांनी रोल ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, तुषार रुकारी यांनी मेडिकेशन एरर या विषयांवर बहुमोल मार्गदर्शन सर्व उपस्थित फार्मासिस्ट यांना केले. यावेळी अध्यक्ष आनंद रासम, सुनील छाजेड यानीही बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी हा फार्मासिस्ट रिफ्रेश कोर्स पूर्ण केलेल्या सर्व फार्मासिस्टना महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलतर्फे विशेष सर्टिफिकेट वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित फार्मासिस्टनी आपले मनोगत व्यक्त करताना  कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून रिफ्रेशर कोर्सचा उपयोग आपल्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी होईल असे सांगून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले. या फार्मासिस्ट रिफ्रेश कोर्सच्या नियोजनासाठी मालवण तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर सुपल, ललित ढोलम, दयानंद परब, ओंकार मांजरेकर, विरेश येशजी, अमेय पारकर, दत्तात्रय पारधीये, संघटन सचिव  काशिनाथ तारी,  देवगड तालुका अध्यक्ष प्रवीण जोग, समीर खाड्ये, संदीप वारीक, श्रीपाद कुलकर्णी, वैभववाडी तालुका अध्यक्ष मंगेश लोके, जिल्हा सचिव संजय सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष संजय घाडीगावकर, विवेक आपटे, दयानंद उबाळे, कुडाळ तालुक्यातील प्रसाद बाणावलीकर, सावंतवाडी तालुक्यातून अमर गावडे, सचिन मुळीक, संतोष राणे, संदीप राऊळ, वेंगुर्ला तालुक्यातून ओमकार खानोलकर, आशिष पाडगावकर, विभा खानोलकर, दोडामार्ग तालुक्यातून  प्रवीण नाईक यांनी नियोजन केले. या फार्मासिस्ट रिफ्रेशर कोर्ससाठी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचेही बहुमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद रासम तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव संजय सावंत यांनी केले.