वेंगुर्ल्यात 'राष्ट्रीय यमोदरी बोंसाय सुई सेकी कार्यशाळे'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

झाडांचे शास्त्रशुद्ध बोन्साय प्रदर्शन ठरले आकर्षण
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2023 20:42 PM
views 64  views

वेंगुर्ले  : महाराष्ट्र, केरळ ,कर्नाटक, गोवा तामिळनाडू अधिराज्यातून सहभागी झालेले १६० सभासद आणि बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन, साउथ एशिया बोन्साय फेडरेशन गार्डन्स क्लब कोल्हापूर, हॉर्टिकल्चर कॉलेज ऑफ मुळदे यांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ले येथील राष्ट्रीय यमोदरी बोंसाय सुई सेकी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेतील अभ्यास आणि प्रात्यक्षिके सहभागींमध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण करून गेली.

      बीसीआयच्यात सुजाता भट व त्यांच्या सहकाऱ्यांनी साईकेई या प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवले. या बोन्सायचे लगेच लिलाव करण्यात आला.सहभागी विद्यार्थ्यांना यातून स्टार्टअप सारखे व्यवसाय निर्मिती मार्गदर्शन करण्यात आले. खडकांचे सौंदर्य दाखवणारी सुईसेकी ही कला कशाप्रकारे विकसित करता येईल यावर सुधीर जाधव यांनी प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली. 

      मध्यंतरापूर्वी गुहशास्त्र आणि वही ची माहिती यावर एक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सलीम अली और ऑरनिथाॅलॉजी सॅकोन सेंटरच्या धनुषा कवलकर यांनी वेंगुर्ला रॉक्स येथील जैवविविधतेबद्दल चित्रफित दाखवून त्याबद्दल उत्सुकतावर्धक माहिती दिली. भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत पाटील व योगिता पाटील यांनी मांडलेले विविध खडकांचे प्रदर्शन व खडकातील वैविध्य बद्दलची माहिती अतिशय मनोरंजक व वैज्ञानिक ठरली.

पुढील सत्रात एस ए बी एफ चे कोषाध्यक्ष राजीव वैद्य यांनी रॉकस्टाईल प्रकारचा बोन्साय करून दाखविले.सहभागी विद्यार्थी नर्सरी उद्योग विद्यार्थी नर्सरी उद्योजक व इतर हौशी उद्यान प्रेमींनी स्वतः बोन्साय करण्याचा अनुभव घेतला.

     वेंगुर्ल्यातील योगा विषयक प्रात्यक्षिके सागरेश्वर येथे साक्षी बोवलेकर यांनी सहभागी कडून करून घेतली. तर कांदळवन विषयक माहिती विद्यार्थ्यांना देऊन झाडांची प्रतिकात्मक लागवड ही करून घेण्यात आली.

शैक्षणिक वैज्ञानिक व्यावसायिक क्षेत्रातील विविध मार्गदर्शक विद्यार्थी संशोधक आणि हौशी उद्यान प्रेमी व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र येऊन अनेक प्रकारच्या चर्चा घडवून आल्या.

     एकमेकांकडून झालेली माहितीची देवाणघेवाण निश्चितच नवनिर्मितीला व नव संशोधनाला चालना देणारी ठरली. शंभर वर झाडांचे अतिशय शास्त्रशुद्ध मांडलेले बोन्साय प्रदर्शन आणि त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सहभागी त्यांचा हा अनोखा मेळा निश्चितच यशस्वीरित्या पार पाडला व वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ आणि संपूर्ण नगरपरिषद अधिकारी- कर्मचारी यांनी त्यासाठी अपरंपार कष्ट घेतले आणि ह्या वेगळ्या उपक्रमाला सर्वोत्तरी हातभार लावला.

अशा प्रकारचे कृतिशील कार्यशाळा ही सर्व सहभागींच्या कौतुकाचा विषय बनली आणि निरोप समारंभाच्या वेळी दशावतार कोकणी शिरवाळे रस, आंबोळी, वाटाणा उसळ या खास पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतलेली मंडळी बरंच काही शिकून गेली.