डिजिटल मीडिया वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकणसाद LIVE च्या जुईली पांगम यांसह रश्मी नर्से, नितीन जोसलकर, गौरीश आमोणकर यांचं खास मार्गदर्शन
Edited by: विनायक गावस
Published on: January 14, 2024 14:09 PM
views 52  views

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र यांच्यावतीने सिंधुदुर्गात प्रथमच डिजिटल मीडिया वर्कशॉपचे आयोजन करण्यात आलं होत‌. श्रीराम वाचन मंदिर येथे डिजिटल मीडियातील संधी यावरील हे  वर्कशॉप पार पडलं. सिंधुदुर्गातल्या पहिल्याच अशा पद्धतीच्या वर्कशॉपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

सुरुवातीला दीपप्रज्वलन करून या वर्कशॉपचं उदघाटन करण्यात आला. श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, इतिहास अभ्यासक डॉ.जी ए बुवा यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलं. डिजिटल मीडियातील संधी, कंटेन्ट कोणता निवडावा, येणाऱ्या अडचणी, बदलतं बातम्याचं स्वरूप, व्हिडीओ एडिटिंग कसं करावं ?, व्हायरल बातम्या करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन करण्यात आलं. ब्लू बे स्टुडिओ अँकर पत्रकार रश्मी नर्से जोसलकर, व्हिडीओ एडिटर नितीन जोसलकर, डिजिटल कंटेन्ट क्रिएटर अँकर गौरीश आमोणकर, कोकणसाद LIVE च्या जुईली पांगम यांनी मार्गदर्शन केलं. या वर्कशॉप मध्ये जर्नालिजमचे विद्यार्थी, युट्युबर्स, ब्लॉगर यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या राणे सामंत यांनी केलं. तर श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी आभार मानले.