वेंगुर्ला येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुरक्त प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला, व सहयोगी संस्थांचे आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 22, 2022 08:16 AM
views 217  views

वेंगुर्ला : येथील चिमुकला चि. समर्थ याच्या ५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुरक्त प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला व हॉस्पिटल नाका कला, क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन बी. के. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे करण्यात आले होते.

     यावेळी एकूण ३५ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

    शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर,सिंधुरक्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, हॉस्पिटल नाका मंडळाचे अध्यक्ष नंदू गवस, माजी मुख्याध्यापिका सुप्रिया हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते बाबली वायंगणकर, डॉ.महात्मे, सिंधुरक्त प्रतिष्ठानचे सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, भाजपचे सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

     यावेळी आदित्य हळदणकर व कुटुंबियांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक करून चि.समर्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी हॉस्पिटल नाका मंडळाचे कार्यकर्ते शिव केरकर, पीटर डिसोझा, पप्या गावडे, प्रशांत गावडे, विल्सन डिसोझा, अमित म्हापणकर, सौरभ धुरी, अमित नाईक, अमेय खानोलकर, सिंधुरक्त प्रतिष्ठानचे वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ॲलिस्टर  ब्रिटो, उपाध्यक्ष राजेश पेडणेकर, प्रसाद नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.