
सावंतवाडी : शाळेबद्दल ऋण व्यक्त करा, कृतज्ञता महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी ध्येय घेऊन जगलं पाहिजे. त्यासाठी अविरत प्रयत्न करत रहा, पुस्तके वाचा, आपलं मत व्यक्त करताना स्पष्ट व्यक्त व्हायला हवे. तरच खंबीरपणे या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवाल. जिद्द चिकाटीने ध्येय गाठण्यासाठी सज्ज व्हा, आईवडील, शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन पुढे चला. निवड करताना आपल्याला कोणतं क्षेत्र आवडते ? ते ध्यानात घेऊन यशस्वी वाटचाल करीत रहा असे मौलिक विचार अॅड सुभाष पणदूरकर यांनी ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाने आयोजित केलेल्या विद्यार्थी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कळसुलकर हायस्कूल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक व स्वागत संस्थापक अध्यक्ष वाय पी नाईक यांनी केले. यावेळी मान्यवरांना सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दहावी उत्तीर्ण रेश्मा पालव ९९.४०%इन्सुली , (तालुक्यात प्रथम)विधिता केंकरे विद्यापीठात प्रथम, वैभवी बांदेलकर (९५%) आदी पाटील (९७.६०%) रिना वेंगुर्लेकर (९३%) सुमुख केंकरे, अवनीश लोंढे,निशाद सावंत, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले बद्दल आस्था अभिमन्यू लोंढे हिचाही गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बालसाहित्यिक मनोहर परब यांचाही शाल, सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कळसुलकर प्रशाळेला यावर्षी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत.अशा शैक्षणिक दीर्घ परंपरा लाभलेल्या शाळेचे मुख्याध्यापक पदी नियुक्ती एस व्ही भुरे यांचाही ज्ञानदीप मंडळातर्फे शाल, सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधिता केंकरे, आदी पाटील, रेश्मा पालव,निशाद प्रदीप सावंत या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन ज्ञानदीपने सन्मानित करुन प्रेरणा, प्रोत्साहन, कौतुकाची थाप दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी रमेश बोंद्रे, भरत गावडे, गोविंद वाडकर, मनोहर परब, प्रा.उत्तम पाटील,एस व्ही भुरे, संदेश पालव, वैभव केंकरे यांनी मनोगत व्यक्त करुन मौलिक मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अध्यक्ष अॅड सुभाष पणदूरकर, मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख,एस.आर मांगले, भरत गावडे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, गोविंद वाडकर, रमेश बोंद्रे,उदय बांदेलकर,सौ.प्राची प्र.सावंत, आत्माराम पालेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, सिद्धेश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन सौ.सोनाली बांदेलकर, सूत्रसंचालन अनिल ठाकूर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यी, पालक वर्ग, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.