
सावंतवाडी : येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी शेकडो भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.











