उबाठा युवासेनेच्या 'निर्धार विक्रमी विजयाचा, सुसंवाद निष्ठावंताचा' उपक्रमाला उदंड प्रतिसाद

Edited by: संदीप देसाई
Published on: February 11, 2024 14:41 PM
views 110  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यात युवा सेनेने आयोजित केलेल्या 'निर्धार विक्रमी विजयाचा सुसंवाद निष्ठावंताचा' या उपक्रमाला माटणे, कोनाळ व मणेरी या तिन्ही जिल्हा परिषद विभागात मोठा प्रतिसाद मिळाला. युवा सेनेचे कोकण सचिव तथा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या कामाचे माहिती पत्रक यावेळी उपस्थित युवक, महिला व ग्रामस्थांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

त्या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे, सोशल मीडिया तालुका प्रमुख संदेश राणे, युवा सेना कुडाळ शहर प्रमुख संदीप महाडेश्वर, महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, उपजिल्हा संघटक विजय जाधव,  उप तालुका संघटक संदेश वरक, युवा सेना उपतालुकाप्रमुख सिद्धेश कासार, युवासेना  कोनाळ विभाग प्रमुख अल्विन लोबो, माटणे  विभाग प्रमुख समीर मावसकर, मणेरी विभाग प्रमुख प्रदीप सावंत, कोनाळ उपविभाग प्रमुख सचिन केसरकर, कोनाळ उपविभाग संघटक प्रदीप गावडे, साटेली भेडशी उपविभाग प्रमुख विक्रांत धरणे, वझरे उपसरपंच लक्ष्मण गवस, ग्राहक संरक्षण तालुकाप्रमुख राजू गावडे, शिवसेना मणेरी विभाग प्रमुख शिवराम मोरलेकर,  शिवसेना उपविभाग संघटक गणेश धुरी,  शिवसेना साटेली भेडशी उपविभाग प्रमुख गणपत डिंगणेकर, शिवसेना माटणे विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, महिला कोनाळ विभाग प्रमुख जेनिफर लोबो, महिला उप तालुकाप्रमुख नयनी शेटकर, दोडामार्ग माजी सभापती सुनंदा धरणे महिला उपविभाग प्रमुख अक्षता दळवी, युवती सेना तालुकाप्रमुख गौरवी नाईक, कुडासे उपसरपंच आत्माराम देसाई, अश्विन जाधव, विजय कांबळे, विश्वनाथ शेटये, सुशील सावंत क्षितिज मणेरकर तसेच मोठ्या प्रमाणावर युवक युवती महिला उपस्थित होत्या.

यावेळी झरेबांबर पंचायत समिती युवासेना उपविभाग प्रमुख पदी यतेश गोवेकर यांची निवड करण्यात आली. तर मणेरी उपविभाग प्रमुखपदी शुभंकर देसाई निवड करण्यात आली आहे.