सावंतवाडीत आज 'छावा'

Edited by:
Published on: March 11, 2025 16:14 PM
views 329  views

सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त सावंतवाडी सकल हिंदू समाजाच्यावतीने आज दि. 11 मार्च रोजी सायंकाळी 06:30 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ "छावा" या ऐतिहासिक चित्रपटाचे विनामूल्य विशेष आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्ष जीवनाचा धगधगता इतिहास उलगडून सांगणारा हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांचाही खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षात्कार घ्यावा असे आवाहन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.