पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील : एकनाथ शिंदे

कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावलं सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघास आश्वासन
Edited by:
Published on: June 06, 2023 15:59 PM
views 257  views

सावंतवाडी : कोकणच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर ,कार्याध्यक्ष सतीश पाटणकर ,सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर ,मंगेश जावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी शालेय शिक्षण मंत्री केसरकर जेजे प्रस्ताव आणतील त्याला मंजुरी दिली जाईल असे शिंदे यांनी सांगून कोकणातील तरुणांच्या हाताला पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे उपक्रम आणि योजना प्राधान्याने राबविण्यात येतील असेही शिंदे यांनी सांगितले.

कोकण असा प्रांत आहे ज्या मध्ये काश्मीर मधला बर्फ सोडून जागतिक पर्यटनाचे निकष पूर्ण करणारा भाग आहे सागरी पर्यटन ,स्कुबा डायव्हिंग ,कृषी पर्यटन,जलक्रीडा ,साहसी पर्यटन,मेडिकल टुरिझम,हिस्ट्री टुरिझम,कातळ शिल्पे,पांडवकालीन लेणी,कल्चर टुरिझम,जंगल सफर,ऐतिहासिक मंदिरे ,गड किल्ले वनराई,अभयारण्य या सर्व पर्यटन क्षेत्रात कोकण स्वतंत्र रित्या विकसित होऊन महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावू शकते .महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विकास आणि कोकणाचा पर्यटन विकासाचा विचार करता पर्यटन वाढीसाठी आवश्यक संसाधने कोकणात निसर्गतः प्राप्त आहेत आवश्यक आहे तो कोकणाच्या पर्यटन विकासास प्राधान्यक्रम देऊन मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून कोकणातील तरुणांना राज्य सरकारमार्फत क्रांती कारक बदल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले .                   सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंड कर यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांच्या अडीअडचणी मांडल्या. आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा प्रशासन स्तरावर मान्यता मिळून २५ वर्षापेक्षा जास्त काळ लोटूनही पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक ते बदल स्थानिक ,प्रशासन स्तरावर झालेले नाहीत वास्तविक पर्यटन वाढीसाठी पूरक वातावरण असताना स्थानिक व्यावसायिकांना पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक बदल ,नियमावली ,शासकीय अध्यादेश होणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी या क्षेत्रात स्थानिक व्यावसायिकांना समाविष्ट करून त्यांचे दरडोई आर्थिक उत्पन्न वाढवणारी एकही योजना गेल्या २५ वर्षात राबवू शकले नाहीत. अपवादासाठी न्याहरी निवास ही योजना रजिस्टर होण्यासाठी ५००० रुपये स्थानिक होम स्टे धारकाकडून आकारून त्या बदल्यात पर्यटकांचे निवासाचे बुकींग देण्यात येईल असे सांगून ही गेल्या २५ वर्षात एकही व्यावसायिकास एकही निवासासाठी बुकींग दिले नाही .कृषी पर्यटन पॉलिसी बनली परंतु त्या मध्ये कोकणच्या शेतकऱ्याचा विचार करून पॉलिसी बनविणे गरजेचे होते .जलक्रीडा पॉलिसी चा विचार करता ही स्थानिक पर्यटन व्यावसायिक कुठल्या क्षमतेची बोट चालवतात आणि कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करतात त्या प्रमाणे पॉलिसी बनणे गरजेचे आहे त्या कोकणात पर्यटन क्षेत्रात क्रांती घडविणारा सी वल्ड  सारखा प्रकल्प प्रशासक्रीय मानसिक ते मुळे थांबलेलेला आहे .पर्यटन व्यवसाय वाढीसाठी कोकणच्या जनतेसाठी आवश्यक त्या नियमावली अनुसरून  आपण स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ जाहीर केल्यास येणाऱ्या काळात कोकणच्या जनतेसाठी राज्य सरकारचा हा निर्णय कोकणच्या आर्थिक सुबत्तेसाठी महत्वाचा ठरेल असे महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.