तहसीलदार पवार यांच्या निरोप समारंभात कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 01, 2023 12:52 PM
views 1158  views

कणकवली : एक अधिकारी किती चांगला काम करु शकतो,हे आज तहसीलदार आर.जे.पवार यांच्या कामातून दिसून येत आहे. आर.जे.पावर हे नंदुरबार सारख्या आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यातील एका गावातून ध्येयाने झपाटलेल्या तरुण सिंधुदुर्गात आला. त्यांनी महसूल विभागात काम करताना पद महत्वाचे नाही,सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका जपली आहे. तसे पाहता लोकांचा महसूल विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो. त्यातही कणकवलीत शेतकरी,कष्टकरी डोळ्यासमोर ठेवून तहसीलदार आर.जे.पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली,हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लेखक,प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. कणकवली तहसीलदार कार्यालय येथे महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसीलदार आर.जे.पवार यांची बदली देवगडला झाली. त्याबद्दल निरोप संभारभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नूतन तहसीलदार दीक्षांत देशपांडे,निवासी नायब तहसिलदार गौरी कट्टे , नायब तहसिलदार शिवाजी राठोड , प्रिया परब , मंडल अधिकारी दिलीप पाटील , संतोष नागावकर , योजना सापळे , अव्वल कारकून संभाजी खाडे, सर्जेराव राणे, बापू जाधव , सुचित्रा आडारकर, सत्यवान माळवे , महसुल सहाय्यक रंजित चौगुले, अनंत सावंत, पुनम मुळे, महादेव बाबर , मनोज आव्हाड , मयुरी चोपडे, तलाठी श्रीकांत जाधव , एन. एस. लांबर , पी. एस. बसाटे, विरेंद्र रासम, गोजीरी गोडे, मंजिरी माईणकर, किर्ती कांबळे , सुवर्णा कडुलकर , श्रीमती ममता तांबे ,तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशिद , राजेश चौगुले, महेश सुतार , शंकर बगार , विकास म्हापसेकर, शिपाई राजेश शिरवलकर , शंकर धुरी , कोतवाल श्री. जाधव , समीर राणे, श्री. आरेकर, श्री. तांबे यासह मुद्रांक विक्रेते सुनिल रेपाळ , भालचंद्र साटम, बाळा परब , संजय मालंडकर , रेशन धान्य विक्रेते बाबू नारकर, पत्रकार संतोष राऊळ , भगवान लोके, उमेश बुचडे आदींसह महसुल कर्मचारी उपस्थित होते.

प्रा.प्रदीप ढवळ म्हणाले, कामकाजात पवार यांनी आणलेली सुसूत्रता याची यादी लिहून घेण्याची गरज आहे. हे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी मान्य केल. ही जाणीव अधिकाऱ्यांमध्ये असली तरच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल, तरुण आहेत. देशपांडे,उद्या जिल्हाधिकारी होतील. कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्याने प्रेम किती केले हे आजच्या कार्यक्रमात दिसून येत आहे, महत्वाचे आहे.हा दीक्षांत समारंभ आहे.

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले, कुठल्याही पदावर असलो तरी नागरिकांना न्याय दिला पाहिजे.तहसीलदार आर.जे.पवार यांचे गुण आत्मसात करेन, आता देवगड मध्ये असल्याने मला त्यांचे मार्गदर्शन होईल.त्याचे गुण आत्मसात करत जनतेला न्याय देण्याची भूमिका प्रशासन घेईल. पवार यांच्या वाटेवर चालण्याचे काम केलं जाईल.प्रशासनाचा केद्रबिंदू असेल तो म्हणजे गरीबांना न्याय देण्याचा असेल,असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

मंडल अधिकारी दिलीप पाटील म्हणाले, तहसीलदार आर.जे.पवार हे तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार असा प्रवास आम्ही पहिला आहे. चारही पदांवर कार्यरत असताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. गेल्या चार वर्षात कर्मचाऱ्याला एकही नोटीस न देता चागलं काम केले.त्यांनी समाजाची सेवा आपल्याला प्राप्त अधिकारातून करण्याचे काम केलं.त्याच्यासारखा अधिकारी आम्ही पहिला नाही.

उपलेखापाल संभाजी खाडे म्हणाले, माझ्या जीवनात सेवेत काम करत असताना तहसीलदार आर.जे.पवार यांनी चांगले मार्गदर्शन केले.त्यानी काम करायला शिकवले आहे.माझ्यामध्ये जो संयम आला,हा त्यांच्यामुळे आहे.शालेय शिक्षण पेक्षा जीवनात चांगले माणूस बनायचे असते,त्याचा आदर्श पवार आहेत. या कार्यक्रमात महादेव बाबर,सत्यवान माळवे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यात तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशिद यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांना मिठी मारीत भावना अनावर झाल्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तलाठी गणेश गोडे यांनी केले, तर आभार मंडल अधिकारी संतोष नागावकर यांनी मानले.