
वैभववाडी : तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात सुरक्षारक्षकाकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.हा प्रकार रविवारी रात्री घडला. मात्र, याची कोणतीही तक्रार पोलीसांत अद्याप पर्यंत झालेली नाही.
तालुक्याच मुख्य रुग्णालयात काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांमध्ये रविवारी रात्री वाद झाला. तु शासनाचा फुकट पगार खातो असे सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याला बोलल्यावरून हा वाद सुरू झाला.याच रुपांतर थेट मारहाणीत झाले.सुरक्षारक्षकाने त्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली.या प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.वरिष्ठांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावले.सायंकाळी उशीरापर्यंत या प्रकाराची पोलीसात नोंद झाली नव्हती.