स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आत्मसात करा : सुनील पवार

कारागृहातील बंदिवानसाठी सावरकरांचा जीवनप्रवास उलघडला
Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 24, 2024 06:55 AM
views 108  views

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान आहे  त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करा  असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे सदस्य तथा शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड  अध्यक्ष सुनील पवार यांनी ओरोस जिल्हा कारागृह येथे  केले.

 कारागृहातील बंदिवानसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रवास  चित्रफीतच्या माध्यमातून उलगडण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ज्यांनी देशासाठी आपलं अखंड आयुष्य वेचले. अंदमान येथील तुरुंगात त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली  हाल अपेष्टा सहन केल्या अशा विद्याविभूषित असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रवास चित्रफीतच्या माध्यमातून उलगडला जावा या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने जिल्हा कारागृह ओरोस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी कारागृहाचे अधीक्षक ब्रह्मानंद लटपटे, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर,  कारागृहाचे अधिकारी भास्कर भोसले,आनंद उशिणकर, पत्रकार अजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंत्रे राजेंद्र पाटील, सत्यवान कदम, सौ. प्रार्थना परब,कावेरी राणे, अमित राणे आदी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन मागील वर्षी अमृत महोत्सव वर्ष साजरे केले.  ज्या वीरांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले ज्यांनी  संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले स्वतःच्या आयुष्याची रागरांगोळी केली. अशा अनेक हुतात्म्यांमध्ये एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर होय   त्यांच्यामुळेच आपण  आनंदी जीवन जगत आहोत . भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात असणारे  त्यांचे योगदान आपण विसरून चालणार नाही. त्यांचा आदर्श आपण सातत्याने घेतला पाहिजे.स्वातंत्रवीर सावरकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते. छत्रपती शिवाजी महाराज व  स्वातंत्रवीर सावरकर यांचा आदर्श प्रत्येकाने जोपासून वाटचाल केली पाहिजे.आज आम्ही स्वातंत्र्यवीर  सावरकर राष्ट्रीय स्मारकच्या माध्यमातून त्यांचा मुक्ती शताब्दी सोहळा साजरा करताना त्यांचे विचार त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्टा या सर्वांसमोर आल्या पाहिजेत. या अनुषंगाने  कार्यक्रम घेतलेला आहे त्यांचा हा प्रवास चित्रफीतच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही  यानिमित्ताने प्रयत्न करत असल्याचे सांगितले यावेळी समितीच्या वतीने कारागृहासाठी स्वातंत्र्यवीर  सावरकर यांची प्रतिमा व पुस्तके भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर,सायलीन सामंत, अक्षय दळवी यांचे सहकार्य लाभले. अधीक्षक श्री. लटपटे यांनी असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतल्याबद्दल सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे आभार मानत असे कार्यक्रम सर्व ठिकाणी झाले पाहिजेत असे सांगितले.