मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करा !

मनसेची सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख अधिक्षकांकडं मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: December 15, 2022 16:20 PM
views 310  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट देत अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागात मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून शासकीय जमीन मोजणी कामासंदर्भात होणारी दिरंगाई लक्षात घेता नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे तालुक्यातील मोजणीची बरीच कामे प्रलंबित आहेत. शिवाय नागरिकांना कार्यालयात येऊन सुद्धा वेळेत जमीन नकाशे मिळत नाहीत परिणामी त्यांना नाहक हेलपाटे मरावे लागतात तसेच आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जमीन रेकॉर्ड, दस्ताऐवज सुरक्षित नाहीत याकडे मनसे पदाधिकारी यांनी लक्ष वेधले. या मागण्याची पूर्तता तातडीने करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली व त्यास अधीक्षक सौ साकोरे यांनी त्रुटी दूर करण्याचे उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.यावेळी माजी शहर अध्यक्ष तथा विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार मंदार नाईक शुभम सावंत कौस्तुभ नाईक मनोज कांबळी सावळाराम गावडे ओमकार गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.