जुन्या पेन्शनसाठी एल्गार..!

Edited by:
Published on: December 14, 2023 13:55 PM
views 314  views

कुडाळ : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आज 14 डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी शासकीय आणी निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर अधिकारी महासंघाने सामुदायिक रजा आंदोलन करत संपाला पाठिंबा दिला आहे.

या संपाच्या पार्श्वभूमी ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केल्या. या संपात आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारीवर्गाने जोरदार निदर्शने केली. घोषणानी परिसर दणाणून गेला होता. यावेळी  सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे एस. बी. माळवे, सखाराम सकपाळ, सचिन माने, एम. जी. गवस, महाराष्ट्र राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हा सचिव प्रकाश तेंडुलकर,व्ही. व्ही. पाटील,सुदीप पेडणेकर,सोनाली काटकर,विकास वाडीकर,विदयानंद शिरगावकर, कास्ट्राईब संघटनेचे आकाश तांबे,जिल्हा मराठा संघटनेचे दिनेश म्हाडगुत,अध्यापक संघाचे अजय शिंदे,शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर,सी.डी.चव्हाण,प्रशांत आडेलकर,विजय मयेकर,कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष, संदीप कदम,मुख्याध्यापक संघाचे गुरू कुसागावकर,कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष  संजय पेंडुरकर,सचिव अभिजीत जाधव,मारूती पूजारेकर,दशरथ काळे,अभिजीत जाधव,संभाजी कोरे,ग्रामसेवक कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर आदि उपस्थित होते.