
दोडामार्ग : बागायतींच्या गावात तळकट भिकेकोनाळ येथे गेलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री केर गावात दाखल झाले आहेत. इथं हत्तींनी भात शेतीचं नुकसान केलंय.
केर येथील हत्ती तळकट, कोलझर ते कुंभवडे पर्यंत पोहचले होते. बरेच दिवस केर गावात हत्ती दिसत नव्हते. शिवाय नुकसानही नव्हते. यावेळी गोपाळ देसाई, शिवराम देसाई, विनायक देसाई, नारायण देसाई आदी शेतकऱ्यांच्या भातशेतीचे त्यांनी नुकसान केले. काही शेतकरी आपल्या बागायतीत न गेल्याने आणखीन नुकसान समजू शकलं नाही. वनविभागाला याबाबत कल्पना दिली असून नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.