
दोडामार्ग : तिलारी परिसरातील हत्तींनी आपला मोर्चा घोटगे गावात वळविल्याने तेथील केळी, सुपारी वं नारळ बागायतदार भयभीत झाले आहेत. वनविभागाने या हत्तींना आवर घालावा अशी मागणी घोटगे सरपंच सौ.भक्ती भरत दळवी यांनी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तिलारी परिसरात हत्तीचा वावर होता. परंतू हत्तीचा कळप एकाच जागी स्थिर न राहता अन्नाच्या शोधात नवीन नवीन भागाचा शोध घेत आहे.
तीन चार दिवसांपूर्वी हत्तीचे वास्तव परमे गावात होती. तेथे काही प्रमाणात बागायातीची नुकसान केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घोट्गे गावाकडे वळविला आहे. आठ दिवसांपूर्वी एका मोरक्या हत्तीने घोटगें गावातील परिसराची पाहणी केली होती. त्याच्या पाऊलाचे ठसे ग्रामस्थांनी पाहिल्याचे सांगण्यात येते. मोरक्या हत्तीने पाहणीनंतर आठ दहा दिवसांनी अन्य कळपाला घेऊन मोराक्या हत्ती घोटगे गावात दाखल झाला आहे. हत्तीकडून वस्ती लगत नुकसानीचे सत्र चालू असल्यामुळे ग्रामास्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक केळीचे उत्पादन एकट्या घोटगें गावात आहे. गोवा मंडळ, तमिळनाडू, केरला, वेलची, गावठी अशा विविध जातीचे केळी उत्पादन येथे घेतले जाते. येथूनच लाखो केळीचे घड चिप्स काढण्यासाठी मुंबई येथे पाठविले जातात . गावातील उदर निर्वाहाचे प्रमुख साधन केळी पीक, सुपारी, काजू आणि हजारोच्या संख्येत माड बागायती आहे. महिन्याकाठी लाखो रुपयांची उत्पादन देणारी बागायती हत्तीच्या आगमनाने धोक्यात आली आहे. सध्या वस्तीलगत वावर करणारा हत्तीचा कळप गावातील बागायातीच्या दिशेने जाऊ नये, याची खबरदारी वनविभागाने घ्यावी. अशी मागणी घोटगे सरपंच सौ. भक्ती भरत दळवी यानी केली आहे.