कुडाळ बाजारपेठेतील विद्युत समस्या मार्गी

शिवसेना व युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 17, 2025 17:51 PM
views 43  views

कुडाळ : शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरातील नागरिकांच्या विद्युतविषयक समस्यांबाबत महावितरण (M.S.C.B.) कार्यालयात केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कुडाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील विजेच्या समस्यांवर केलेल्या पाठपुराव्यानंतर आज महावितरणकडून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजारपेठेतील अनेक समस्या मांडल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विजेच्या खांबांवर होणारे स्पार्किंग, कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा आणि वारंवार होणाऱ्या विजेच्या खेळ खंडोबा या प्रमुख प्रश्नांवर चर्चा झाली होती. या समस्या सोडवण्यासाठी तातडीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत महावितरणचे अधिकारी व वायरमन यांच्या माध्यमातून कुडाळ बाजारपेठेतील विद्युत यंत्रणेचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये धक्कादायक बाब समोर आली. बाजारपेठेतील खांबांवर असलेले कंडक्टर (वाहक) हे कॉपरचे (तांब्याचे) असून त्यांना जोडणी केलेली वायर मात्र ॲल्युमिनियमची (अल्युमिनियमची) होती. यामुळेच विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. या त्रुटी समोर आल्यानंतर आज महावितरणच्या माध्यमातून बाजारपेठेतील जुने कॉपर कंडक्टर बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच, बाजारपेठेतील इतर लाईट मेंटेनन्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

हे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाठ, मेघा सुकी, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, दीनार शिरसाट, नितीन सावंत, शुभम महाडेश्वर, अमित राणे, तेजू वर्दम, अशोक किनळेकर, बाळा राऊळ यांनी विशेष पाठपुरावा केला. या कामामुळे कुडाळ बाजारपेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, शिवसेना व युवा सेनेच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने कुडाळ बाजारपेठेतील विद्युत समस्या मार्गी! शिवसेना व युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश 

चर्चेत काय झाले? : काही दिवसांपूर्वी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजारपेठेतील अनेक समस्या मांडल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने विजेच्या खांबांवर होणारे स्पार्किंग, कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा आणि वारंवार होणाऱ्या विजेच्या खेळ खंडोबा या प्रमुख प्रश्नांवर चर्चा झाली होती. या समस्या सोडवण्यासाठी तातडीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.

सर्वेक्षणातून त्रुटी उघड : या मागणीची तात्काळ दखल घेत महावितरणचे अधिकारी व वायरमन यांच्या माध्यमातून कुडाळ बाजारपेठेतील विद्युत यंत्रणेचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये धक्कादायक बाब समोर आली. बाजारपेठेतील खांबांवर असलेले कंडक्टर (वाहक) हे कॉपरचे (तांब्याचे) असून त्यांना जोडणी केलेली वायर मात्र ॲल्युमिनियमची (अल्युमिनियमची) होती. यामुळेच विद्युत पुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले.

दुरुस्तीच्या कामांना सुरुवात : या त्रुटी समोर आल्यानंतर आज महावितरणच्या माध्यमातून बाजारपेठेतील जुने कॉपर कंडक्टर बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच, बाजारपेठेतील इतर लाईट मेंटेनन्सची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

पाठपुरावा करणाऱ्यांचे आभार : हे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाठ, मेघा सुकी, सुशील चिंदरकर, संदीप म्हाडेश्वर, दीनार शिरसाट, नितीन सावंत, शुभम महाडेश्वर, अमित राणे, तेजू वर्दम, अशोक किनळेकर, बाळा राऊळ यांनी विशेष पाठपुरावा केला.

या कामामुळे कुडाळ बाजारपेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आता नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.