साटेली - भेडशीतील वीज कार्यालय वारंवार बंद ; नागरिकांची गैरसोय

Edited by: ब्युरो
Published on: July 05, 2023 20:47 PM
views 47  views

साटेली भेडशी : साटेली भेडशी पंचक्रोशीतील वीज समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. मात्र येथील विजवितरण चे विभागीय कार्यालय वारंवार बंद असल्यामुळे खेडे गावातून आपल्या वीज समस्या घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कार्यालय बंद असल्याने गैरसोय होत आहे.

              साटेली भेडशी पंचक्रोशीत दमदार पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळेच परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.या खंडित विजेचा सर्वाधिक फटका मांगेली, केर, तेरवण, खराडी, सोनावल सारख्या दुर्गम व ग्रामीण भागात बसत आहे.या भागातील विजपूर्वत सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागत असल्यामुळे नागरिक आपली विजे संबंधित तक्रार देण्यासाठी साटेली भेडशी येथील कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयात येतात मात्र याठिकाणचे वीज कार्यालय वारंवार बंद असल्याने कित्येक नागरिकांना आपली विजेसंबंधी ची तक्रार नदेताच माघारी फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक विजकार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत

        कार्यालय चालु ठेवण्याची मागणी

   यापरिसरातील नागरिकांना विजेच्या सतत होणाऱ्या खंडित पुरवठा व नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता किमान पावसाळी हंगामात तरी विजकार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी सतत कार्यालयात असावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जेणेकरून विजेसंबंधी तक्रार देण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय दूर होईल.

        महालक्ष्मीचा विजपुरवठा बंद केल्याने वीजसमस्या जटील

      तिलारी येथील महालक्ष्मी विदयुत कंपनी मार्फत यापूर्वी तालुक्याला विजपुरवठा होत होता तेव्हा तालुक्यातील विज समस्या मोठया प्रमाणात संपुष्टात आली होती. मात्र मागील काही महिन्यापासून येथून होणारा विजपुरवठा बंद केल्याने या भागातील नागरिकांना सासोली येथून होणाऱ्या विज पुरवठया वर अवलंबून राहावे लागत असल्याने येथील विज समस्या जटील बनली आहे.त्यामुळे येथील विज समस्या पूर्ववत होण्यासाठी महालक्ष्मी येथून होणारा विजपुरवठा पुन्हा जोडण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे