वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची बैठक १९ मे ला !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2024 14:28 PM
views 44  views

सावंतवाडी : वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक १९ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सावंतवाडी तालुका कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.     

पावसाळा अगदी समीप येऊन ठेपला असून अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसात दरवर्षी प्रमाणे विजेचा लपंडाव सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वितरणने करावयाची कामे जसे कि, गावागावातील वीज वाहिन्यांच्या लगतची झाडी छाटणे, विजेच्या तारांवर आलेली धोकादायक झाडे तोडणे आदी कामे अजूनही प्रलंबित असल्याने पावसाळ्यात गंभीर वीज वितरणाबाबत समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वीज समस्यांबाबत महावितरणला जाग आणण्यासाठी पुढे काय पावले उचलायची यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.