
सावंतवाडी : सावंतवाडी आंबोली महामार्गवरील व लाखे वस्ती समोरील लाईटचा पोल गंजून पूर्णपणे धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून दिवस रात्र हजारो वाहने तसेच नागरिक व शाळकरी मुले ये-जा करत असतात. लगतच्याच ठिकाणी मोठी वस्ती असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
या पोलची परिस्थिती पाहून भयभीत झालेल्या तेथील नागरिकांनी महावितरणला कित्येकवेळा याची कल्पना देऊन देखील अद्यापही धोकादायक पोलची दखल घेतली गेली नाही. हा धोकादायक पोल तातडीने बदलण्याकरीता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्त्ये सोमवारी संबंधित अधिकाऱ्याची भेट देऊन निवेदनाद्वारे या गंभीर विषयाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून येथील नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे अशी माहिती रवी जाधव यांनी दिली.