
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या तालुका पत्रकार समित्या व मुख्यालय पत्रकार समितीच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 21 ते 26 एप्रिल या काळात हा निवडणूक कार्यक्रम होत आहे. या निवडीसाठी जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पत्रकार सभासदांनी शक्यतो बिनविरोध, व खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.
या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम खालील वेळापत्रकानुसार होणार असून, पत्रकार समित्यांच्या सर्व तालुकाध्यक्षांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून सभेचे ठिकाण वेळ निश्चित करावे. व आपल्या सर्व सभासदांना माहिती पोहोचवावी असे आवाहनही श्री उमेश तोरोसकर यांनी केले आहे.
दि. २१ एप्रिल.२०२५ रोजी सिंधुदुर्ग नगरी– निवडणूक निरीक्षक उपाध्यक्ष बंटी केनवडेकर, अमित खोत, दि. २२ एप्रिल २०२५ वेंगुर्ला – निवडणूक निरीक्षक सचिव बाळ खडपकर, राजन नाईक, याच दिवशी देवगड– निवडणूक निरीक्षक उपाध्यक्ष संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे.किशोर जैतापकर, दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी–निवडणूक निरीक्षक परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, उपाध्यक्ष संतोष राऊळ, लवू महाडेश्वर. याच दिवशी मालवण – निवडणूक निरीक्षक प्रशांत वाडेकर किशोर जैतापकर,
दि. २४ एप्रिल २०२५ रोजी कणकवली निवडणूक निरीक्षक खजिनदार संतोष सावंत, महेंद्र मातोंडकर याच दिवशी कुडाळ निवडणूक निरीक्षक परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सुहास देसाई दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी दोडामार्ग–बाळ खडपकर व लवू महाडेश्वर, याच दिवशी वैभववाडी – निवडणूक निरीक्षक गणेश जेठे, आनंद लोके. असा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांनी वेळापत्रकानुसार सभेचे ठिकाण वेळ निश्चित करावी. सर्व पत्रकार सभासदांना याबाबत माहिती द्यावी. व या निवडीचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण करावा. असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.