
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते साईनाथ तानावडे यांची बुथ अध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते साईनाथ तानावडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
तसेच त्यांचे अभिनंदनही यावेळी करण्यात आले.यावेळी सावंतवाडी महिला विधानसभा अध्यक्षा नितेशा नाईक,साईनाथ तानावडे,हेमंत तानावडे,अमेय तानावडे,अभिजीत तानावडे,नामदेव तानावडे,अभिजीत तानावडे,सिद्धेश तानावडे,नरेंद्र बोंद्र् यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षाची ध्येय धोरणे समजून घेत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेणे तसेच संघटना मजबूत करणे यासह विविध जबाबदारी पार पाडण्यासाठी साईनाथ तानावडे हे भरीव योगदान देतील असा आशिर्वाद यावेळी अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.