
कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट लोरे येथील मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.
मनोज रावराणे यांनी कणकवली पंचायत समिती सभापती म्हणून कणकवली तालुक्यात केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा प्रवास योजनेच्या कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे ते समन्वयक म्हणून करत असलेले काम सुद्धा प्रभावी झाले होते. या सर्वांची दाखल घेवून पक्षाने त्यांना जिल्हा स्थरावर काम करण्याची संधी दिली आहे. दरम्यान लोकसभा प्रवासचे महाराष्ट्र संयोजक बाळासाहेब भेगडे याच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा प्रवास योजनेचे लोकसभा समन्वय अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.