चक्कर येऊन पडलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्याला जखम ; सामाजिक बांधिलकी धावली मदतीला

Edited by: विनायक गावस
Published on: August 06, 2023 15:08 PM
views 234  views

सावंतवाडी :  सातोसे येथील वृद्ध महिला कुंदा यशवंत बर्डे राहणार काल रात्री एसटी बस स्टँड सावंतवाडी येथे चक्कर येऊन पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव होत असल्यानं कलंबिस्त येथील कांचन बाळकृष्ण कदम हिने तिला उचलून डोक्याला रुमाल बांधला. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ  शेखर सुभेदार यांना याची कल्पना दिली. त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे सदस्य शेखर सुभेदार, प्रवीण पटेकर व नाना देसाई बस स्थानक जवळ पोहोचले. या वृद्ध  महिलेवर प्राथमिक उपचार करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलीस डूमिंग डिसोजा उपस्थित होते. त्यांनी लगेचच पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देऊन  पोलिसांची गाडी मागवली व बांदा पोलीस ठाण्यातून माजी सरपंच सातोसकर यांच्याशी संपर्क केला. त्या महिलेला कॉन्स्टेबल पोलीस ठाण्यातून पी. बी.नाईक व सुभाष नाईक, पोलीस डुमिंग डिसोजा व शेखर सुभेदार यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  दाखल केले. 

प्राथमिक उपचारानंतर नंतर वृद्ध महिलेला  महिला कॉन्स्टेबल पी.बी .नाईक, सुभाष नाईक व सामाजिक बांधिलकीचे शेखर सुभेदार यांनी रात्री 10 वा सातोसे येथे माजी सरपंच सातोस्कर यांच्याशी संपर्क करून कुटुंबियांकडे वृद्ध महिलेला स्वाधीन केले.