विर्डी पुनर्वसन येथील वृद्धा बेपत्ता

Edited by: लवू परब
Published on: June 15, 2025 20:24 PM
views 126  views

दोडामार्ग : विर्डी पुनर्वसन येथून ८५ वर्षीय वृद्ध महिला श्रीमती यमुना लक्ष्मण गवस या २ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेल्यापासून अद्याप परत आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या नापत्ता असल्याची तक्रार दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी फिर्याद रामचंद्र भिवा गवस (५५ वर्षे, मुळ रा. विर्डी पुनर्वसन, सध्या रा. केरी बाहेरील वाडी, ता. सत्तरी, गोवा) यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या आत्या श्रीमती यमुना गवस या २ जून रोजी दुपारी घरातून अचानक निघून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. अखेर १५ जून रोजी सकाळी १०:४० वाजता पोलीस ठाण्यात अधिकृतरीत्या नोंद करण्यात आली. जर कोणाला वरील वर्णनाच्या वृद्ध महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी केले आहे.