पत्नीच्या आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 22, 2024 14:56 PM
views 101  views

देवगड : देवगड मधील शशिकांत नारायण साटम वय ८५ रा.साळशी कुळ्याची वाडी येथील या वृद्धव्यक्तीने स्वतःच्या पत्नीच्या आजाराला वैतागून घरामद्ये दरवाजा जवळील छप्पराच्या लाकडीवाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असून ही घटना 21 मे रोजी सायंकाळी ४.वा. च्या सुमारास घडली आहे . 

या विषयी पोलिसांनकडून मिळालेल्या माहिती च्या आधारे साळशी कुळ्याची वाडी येथील शशिकांत साटम यांची पत्नी गेली चार पाच वर्षापासून पॅरालिसिस या आजाराने आजारी असून तिचे सर्व विधी जागेवरच होत असल्याने तिच्या या आजारपणाला कंटाळून पती शशिकांत साटम यांनी अखेर आत्महत्येचे टोक गाठले. त्यांच्या घरी ही दोघे पती-पत्नीच राहत होती. या घटनेची खबर पोलीस पाटील कामिनी किशोर नाईक यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे . या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक करत आहेत.