नाधवडेत वृद्धाची आत्महत्या

Edited by:
Published on: December 11, 2023 19:09 PM
views 785  views

वैभववाडी : नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील गंगाराम राजाराम ताम्हणकर ( वय-७०)यांनी घराशेजारील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.हा प्रकार आज (ता.११)दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.याबाबत अनंत पाटणकर यांनी पोलीसांत माहीती दिली.

श्री.ताम्हणकर हे मुळ साळीस्ते येथील राहणारे होते. गेल्या वर्षभरापासुन ते नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथे नातेवाईक अनंत पाटणकर यांच्याकडे राहत होते.आज दुपारी जेवण आटोपल्यानंतर घरात दिसले नाहीत म्हणुन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता घरालगत असलेल्या विहीरीत त्यांचा मृतदेह आढळुन आला.ही माहीती श्री.पाटणकर यांनी पोलीसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,पोलीस उपनिरीक्षक रोहीत खोत,पोलीस हवालदार रमेश नारनवर,हरेष जायभाय हे घटनास्थळी पोहोचले.गावातील बंड्या मांजरेकर आणि त्यांचे सहकारी देखील तेथे पोहोचले.स्थानिकांच्या मदतीने विहीरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला.श्री.ताम्हणकर यांना दारूच व्यसन होते.त्यातुनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमीक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला.