
कणकवली : कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचालित गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन // उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण // कोकणासाठी नारायण राणेंच मोठ योगदान आहे // त्यांनी या भागात अनेक प्रकल्प आणले // मात्र, गोशाळेचा प्रकल्प हा दिशादर्शक प्रकल्प आहे // यातून कोकणात नक्कीच धवल क्रांती घडेल // कोकणच्या समृद्धीचा गोवर्धन राणेंनी उचलला आहे // पश्चिम महाराष्ट्रात दुधातून क्रांती झाली // तेथील धडा राणेंनी कोकणात आणला // हा प्रकल्प सा-यांसाठी आदर्श ठरेल // राणेंनी सुरू केलेल्या या प्रकल्पातून मीही प्रेरणा घेतली // राणेंच मार्गदर्शन घेऊन आपणही असा प्रकल्प करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा // कोकणात आल्यावर देवभुमीत आल्यासारखे वाटले // गाय ही केवळ पवित्र नाही तर ती उपयुक्त सुद्धा आहे // आमच्या सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला // महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना व विकासकामे होत आहेत // जनतेने एकहाती सत्ता दिल्यानंतर या विकासाचा वेग आणखी वाढला // राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, आमदार निलेश राणे, आम.रविंद्र चव्हाण, आम. रविंद्र फाटक, आम. दिपक केसरकर, प्रमोद जठार, प्रविण भोसले, दत्ता सामंत, श्वेता कोरगावकर, निमिश राणे, अभिराज राणे होते उपस्थित //