
वैभववाडी : प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाधवडे श्री विठ्ठल रखुमाई मंदीरात याही वर्षी आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.गावचे ग्रामस्थ व मुंबईकर मंडळी मिळून हा उत्सव साजरा करतात.यावर्षीही १७जुलै २०२४रोजी भव्यदिव्य असा एकादशी उत्सव साजरा होणार आहे.त्याच्या नियोजनाची बैठक २२जून रोजी सायंकाळी ६.३०वा. छबिलदास हायस्कूल दादर येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला मुंबई निवासी असणाऱ्या गावकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाधवडे आषाढी एकादशी उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.