घाटात ब्रेक फेल ; आयशर टेम्पो कोसळला 100 फूट खोल दरीत

दोघे गंभीर जखमी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 28, 2025 15:22 PM
views 797  views

दोडामार्ग : कोकणला घाटमाथ्यावरून जोडणारा सर्वाधिक धोकादायक तिलारी घाटातील अपघातसत्र काही थांबत नाही. शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन भयंकर अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ब्रेक फेल होऊन ही गाडी 100 फुट खोल दरीत कोसळली आहे. या अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस हवालदार विजय जाधव व किरण आडे हे घटनास्थळी पोहचले. तिथे त्यांनी गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले व स्वतःच्या वाहनाने चंदगड रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे.

या मार्गावर अनेकवेळा मोठ्या वाहनांचे अपघात झालेत. मात्र वेळोवेळी अशा वाहनांना घाटातून प्रवेश बंद करण्यात यावा अशी मागणी करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात सत्र कायम आहे.