विकास संस्थांचा नफा व त्यांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न : मनिष दळवी

बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार
Edited by:
Published on: July 12, 2024 15:23 PM
views 38  views

कुडाळ : विकास संस्थांचा नफा वाढला पाहिजे त्यांची आर्थिक क्षमता वाढली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे .चांगलं काम करून दाखवण्याची हिंमत संस्था पदाधिकाऱ्यांनी ठेवावी. चांगले व्यवसाय संस्थेने आपल्याकडे खेचून आणले पाहिजे जेणेकरून संस्था सभासद संस्थेत आला पाहिजे.येणाऱ्या नवीन योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे.भात खरेदी बरोबरच काजू बोंड खरेदी सुद्धा संस्थेमार्फत केली पाहिजे. मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा विकास संस्थांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी कुडाळ येथे केले.           

कुडाळ येथील मराठा समाज हॉल,कुडाळ सभागृहात शुक्रुवारी प्राथमिक विकास संस्थांचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर,प्रकाश मोर्य, जिल्हा बॅकेचे  सरव्यवस्थापक , कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, बँक अधिकारी दत्ताराम गावडे तालुका विकास विकास अधिकारी,शाम सरमळकर, आदी उपस्थित होते.

यावेळी ३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १००टक्के वसुली केल्याबद्दल तेंडोली विकास संस्था, माणगाव विकास संस्था,कर्याद विकास सोसा. नारूर,नेरूर विकास संस्था, आंदुर्ले विकास संस्था ,घोटगे विकास संस्था ,निवजे विकास संस्था,पाट विकास संस्था,कुडाळ पंचक्रोशी विकास संस्था,पणदुर वेताळ बांबार्डे विकास संस्था, कडावल विकास संस्था, नेरूर कर्याद नारूर दुकानवाड विकास संस्था,श्री लिंगेश्वर विकास सोनवडे विकास संस्था,कसाल विकास संस्था,हिर्लोक विकास संस्था,सरंबळ विकास संस्था,हुमरमळा विकास संस्था,  झाराप विकास संस्था, डिगस विकास संस्था आकेरी,विकास संस्था,बांबुळी विकास सोसा.तुळसुली वि. सोसा ,चेंदवण विकास सोसा,वालावल कृषी संघ, श्री महादेव विकास कवठी,घावनळे विकास सोसा,वालावल विकास सोसा,वाडी वरवडे विकास सोसा,पांग्रड वाकास सो,आनळेगांव वि.सो.,साळगांव वि.सो.,घावनाळे वि.सो, वालावल वि सो.अशा १००टक्के  कर्ज पूर्ण फेड केलेल्या ३२  तर संस्थास्तरावर  १००टक्के पूर्ण फेड झालेल्या कडावल,पाट,निवजे,वडीवरवडे या ४ विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव याचा सत्कार मनिष दळवी ,संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, याच्या हस्ते करण्यात आला.       

यावेळी बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर,प्रकाश मोर्ये, यांनी आपले विचार मांडले,कुडाळ तालुक्यातील गटसचिवांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार केला व अभिनंदन केलं.. उपस्थितांचे आभार शरद सावंत यांनी मानले