NEMS च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 14:10 PM
views 103  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे व NEMS स्मार्ट किड्स तळेरे येथील प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी 'वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी' येथे सहलीचा आनंद लुटला यामध्ये विद्यार्थ्यांनी स्विमिंग, रेन डान्स,आंधळी कोशिंबीर यासारख्या गोष्टींचा मनमुरात आनंद घेतला.

विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सहशालेय उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामधले NEMS चे चिमुकले विद्यार्थी आपले शिक्षक व आपल्या मित्रमंडळी यांच्यामध्ये दंग झाले होते. विद्यार्थ्यांना ही सहल आनंद देणारी ठरली. या सहलीचे आयोजन शिक्षिका श्वेता आलते, गौरी पवार, चैताली राणे, भक्ती पाटील, तृप्ती साटविलकर यांनी केले होते.