
वेंगुर्ले : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मातोंड यांच्या वतीने येथील न्यु इंग्लिश स्कूल, मातोंड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभु, सिधुदुर्ग जिल्हा भाजप सोशल मीडिया प्रमुख श्रीकृष्ण परब ग्रामपंचायत सदस्य किशोरी परब, सुजाता सावंत, वैभवी परब, सोसायटी संचालक शेखर परब, पपु सावंत, माजी केंद्रप्रमुख रावजी परब यांच्यासहित भाजपचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.