
बांदा : स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.आपण ग्रंथालयात,वाचन कक्षामध्ये सातत्यपूर्ण जायला हवे. विविध महापुरुषांची चरित्र वाचायला हवीत.सामान्य कुटुंबातून माणसे जेव्हा असामान्य होतात तेव्हा ती कशा पद्धतीने असामान्य पदाकडे वाटचाल करतात हे समजून घ्यायला हवे. गुरु आणि शिष्य हे नातं अधिक समृद्ध बनायला हवे.विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून प्राथमिक शाळेत शिक्षण दशेत ध्येयवादी बनायला हवे असे आवाहन गोवा येथील सेवेक्स टेक्नाँलाँजी प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक सुनिल मोरे यांनी केले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित जिल्हा परिषद पुर्ण प्रार्थमिक शाळा विलवडे नं.१ व २, राजा शिवाजी कविद्यालय,विलवडे या तीनही शाळेतील गरजू व होतकरू,अभ्यासू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थांनी व पालकांनी सुनिल मोरे या़च्याशी सवांद साधला.
विलवडे शाळेतील विद्यार्थांना कोकण संस्थेकडुन यावर्षी ३४ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य पुरवून सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. त्याबरोबर विलवडे व इतर गावातील पुरग्रस्ताना ५० हून अधिक कुटुंबियांना धान्य व जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.कोकण संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय उत्तमरित्या काम करत असून जिल्ह्यातील प्रथमच विलवडे धरणातील गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले ज्याच्यामुळे पाण्याचा साथ वाढण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होईल असे उद्गागार सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले.
या व्यासपिठावर सरपंच प्रकाश दळवी, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा दळवी, सानिका दळवी, विनोद पुरोहित, संस्था प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत,संस्था समन्वय हनुमंत गवस, स्कुल कमिटी अध्यक्ष सोनु दळवी, प्रफुल्ल सावंत, रश्मी सावंत, संतोष सावंत,मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, सरेश काळे,परेश धर्णे, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जसे कि विलवडे,बांदा, वाफोली, असनिये,निगुडे,आरोस, साळगाव , माणगाव आणि इतर शाळेतील एकूण १६२ गरजू विद्यार्थांना शेक्षणिक साहित्य वाटप केल्याचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.
संस्थेचे या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून आभार मानण्यात आले. प्रास्ताविक प्रथमेश सावंत,सुत्रसंचालन शिक्षक मनोहर गवस,वनसिंग पाडवी आभार सुरेश काळे यांनी केले.
फोटो : विलवडे येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून ३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना सुनिल मोरे, सरपंच प्रकाश दळवी, प्रथमेश सावंत आणि मान्यवर