सावंतवाडीत शिक्षणमंत्र्यांनी घेतला निसर्ग भ्रमंतीचा आस्वाद

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 14:25 PM
views 225  views

सावंतवाडी : नरेंद्र वन उद्यान येथील निसर्गपर्यटन कामांचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर त्यांनी स्वतः या निसर्ग भ्रमंतीचा आस्वाद घेतला. सावंतवाडी  माझी आहे त्यामुळे तीच्यावर अधिक प्रेम आहे. आज भ्रमंती केल्यानंतर एक आनंददायी अनुभव घेता आला ज्याच वर्णन शब्दात करता येणार नाही. सावंतवाडीकरांसह पर्यटकांनी देखील या भ्रमंतीचा लाभ घ्यावा असं आवाहन दीपक केसरकर यांनी केल.

नरेंद्र डोंगरावरील उद्यानामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी टेन्ट, जिल्ह्यातील सर्व जैवविविधतेची माहिती देण्यासाठी निसर्ग माहिती केंद्र तसेच नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडी शहर पाहण्यासाठी मनोरा, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, ओपन जिम, स्वच्छतागृहे उभारी आहेत. तर जंगल सफारीसाठी विशेष ओपन गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, माजी नगरसेवक राजू बेग, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर आदी उपस्थित होते