शिक्षणाला वय नसते : विकास सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: September 20, 2024 14:09 PM
views 178  views

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजमधून निवृत्त झालेले प्राध्यापक, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे उपाध्यक्ष बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व सिद्ध करून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अधोरेखित झालेले. दिल्ली येथे डॉ. दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीने आर्किटेक्चर विषयांमध्ये 'डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी' ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले. याचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संस्थाध्यक्ष म्हणून माझ्यासहित आपल्या सर्वांना अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी बाब आहे. यावरून एकच गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ते म्हणजे शिक्षणाला वयाची अट नसते. डॉ. दिनेश नागवेकर यांचे ज्ञानार्जनाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन विकास सावंत यांनी केले.

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी मधील सभागृहात आयोजित केलेल्या डॉ. दिनेश नागवेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी संपादित केलेल्या डॉक्टरेट पदवीसाठी अभिनंदनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे उपाध्यक्ष व सत्कारमूर्ती डॉ. दिनेश नागवेकर सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी मिळविलेल्या डॉक्टरेट पदवीसाठी त्यांचे अभिनंदन केले. शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव गुरुवर्य व्ही. बी.नाईक यांनी डॉ. दिनेश नागवेकर हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचे नाव लौकिक होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सर्जनशील कलागुणांनीयुक्त अशा अध्यापनातून त्यांचे बहुतांश विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत चमकदार कामगिरी करू शकले.याचे संपूर्ण श्रेय डॉ. दिनेश नागवेकरना जाते.असे गौरवोद्गार काढून त्यांना मिळालेली डॉक्टरेट ही पदवी ही त्याची पोचपावती आहे. असे सांगून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर सत्कारमूर्ती डॉ .दिनेश नागवेकर यांनी आपल्या मनोगतातून आतापर्यंत बांधकाम  व्यवसायाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती सुमारे 26 पदव्या संपादित केलेल्या असून. त्यासाठी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी आणि राणी पार्वती हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,सावंतवाडीच्या वतीने आज भव्यदिव्य कार्यक्रम करून सत्कार आणि वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. तर संस्था संचालक प्रा. सतीश बागवे यांनी आदरणीय डॉ. दिनेश नागवेकर हे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा .सहकारी म्हणून मला त्यांचे नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांच्याकडून बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि शिक्षणाशी संबंधित खूप काही शिकता आले. असे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी संपादित केलेल्या डॉक्टरेट पदवीसाठी त्याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक मधून सर्व प्राध्यापक, शिक्षकांच्या वतीने ज्येष्ठ प्रा. दशरथ राजगोळकर यांनी डॉ. दिनेश नागवेकर यांनी आपल्या अध्ययन आणि अध्यापनातून  शिक्षकांचे निरंतर ज्ञानार्जन कार्य कसे चालत राहिले पाहिजे याचे आदर्श त्यांनी त्यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना घालून दिलेला आहे. या कार्यातून निश्चितच सर्व प्राध्यापक, शिक्षक प्रेरणा घेतील अशी ग्वाही देऊन. त्यांनी संपादित केलेल्या डॉक्टरेट पदवीसाठी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिले. शिवाय डॉ.जे.बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने प्रा. जोसेफ डिसिल्वा यांनी तसेच डॉ.जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी संचलित यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संचालक तुषार वेंगुर्लेकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिले.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे खजिनदार सी. एल.नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक संदीप राणे, संचालिका वसुधा मुळीक, मुख्याध्यापक जगदीश धोंड, माजी प्राचार्य कृष्णा परब, उपमुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक,पर्यवेक्षक संजय पाटील, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.विनिता घोरपडे, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा.रणजीत राऊळ ,प्रा. दशरथ राजगोळकर, प्रा.डॉ. संजना ओटवणेकर,प्रा.संतोष पाथरवट,प्रा. डॉ. अजेय कामत,प्रा. सविता कांबळे. प्रा.पवन वनवे,प्रा.दशरथ सांगळे, प्रा. वामन ठाकूर,प्रा. महाश्वेता कुबल प्रा.स्मिता खानोलकर प्रा. माया नाईक, प्रा.जोसेफ डिसिल्वा,प्रा. राहुल कदम इत्यादी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले व आभार उपप्राचार्य डॉ.सुमेधा नाईक यांनी मानले.