
कुडाळ : एड्यूब्रॉडने कुडाळ येथे आपले नवीन शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याची घोषणा केली आहे. भारतीय तरुणांना विविध करिअर क्षेत्रांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना उज्ज्वल भविष्य घडवता यावे, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. एड्यूब्रॉडचे संस्थापक राहुल नाईक यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना एम.बी.ए., लॉ, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, मीडिया, फार्मा, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, स्पोर्ट्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याच्या सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत. एड्यूब्रॉडचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यास मदत करणे हे आहे.
राहुल नाईक यांनी सांगितले की, "आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एड्यूब्रॉडच्या माध्यमातून आम्ही केवळ करिअर मार्गदर्शनच नाही, तर त्यांना त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहाय्य प्रदान करणार आहोत."
याशिवाय, उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी शिक्षण कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एड्यूब्रॉड परदेशात नोकरी मिळण्याची उत्तम संधी देत आहे, ज्यामुळे भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर करिअर करण्याची संधी मिळणार आहे.
हे केंद्र सिंधुदुर्ग मधील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी ठरेल, अशी अपेक्षा आहे. या पुढाकारामुळे स्थानिक तरुणांना चांगल्या करिअर संधी मिळतील आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होईल.