खा. सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा | अर्चना घारे परब यांचा पुढाकार

Edited by: विनायक गावस
Published on: July 01, 2023 17:29 PM
views 226  views

दोडामार्ग : संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने दोडामार्ग तालुक्यातील निवडक नामवंत दशावतारी कलाकार यांचा संयुक्त पौराणिक दशावतारी नाटय प्रयोग " सुवर्ण मुद्रिका " सादर करण्यात आला.या नाट्य प्रयोगास नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

तसेच दशावतार कलाकार समिती दोडामार्गचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दशावतार कलाकार समिती दोडामार्ग समितीतील दशावतार कलाकार यांचा सत्कार सोहळा देखील यावेळी संपन्न झाला. नुकत्याच निकाल लागलेल्या इयत्ता दहावी, बारावी, उच्च शिक्षण, पदवी प्राप्त केलेल्या दशावतार कलाकार यांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील या कार्यक्रमात करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करत सुप्रिया ताईंना अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, दशावतार कलाकार समिती दोडामार्ग अध्यक्ष सुभाष लोंढे, उपाध्यक्ष विलास गवस, दोडामार्ग शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, झरे - सरगवे ग्रामपंचायत सरपंच श्रृती देसाई, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष कृष्णा नाईक, सागर नाईक, रत्नाकर गवस आदी मान्यवारांसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.