बांदा केंद्र शाळेत वसुंधरा दिवस

Edited by:
Published on: April 22, 2025 17:57 PM
views 116  views

बांदा : आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याचीच आठवण करून देण्यासाठी दरवर्षी २२एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस पीएम श्री बांदा नं.१ केंद्र शाळेत शाळा परीसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

पर्यावरणात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी झाडे लावून त्यांची जोपासना करणे आवश्यक बनले. या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती जागृती व्हावी म्हणून स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. या दिवशी मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी विद्यार्थ्याना दरवर्षी किमान एक झाड लावून त्यांचे जतन करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील‌, पदवीधर शिक्षिका कृपा कांबळे, उदय सावळ, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे‌, सुप्रिया धामापूरकर‌ तसेच शाळेत ईट राईट स्कूल उपक्रमातील व इको क्लब मधील विद्यार्थ्यांना सहकार्य केले.