
कुडाळ : माड्याचीवाडी येथील श्री देव गावडोबा मंदिरात १३ व १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी सकाळी ८ वा. श्रींची नित्य पूजा, अभिषेक, सायंकाळी ५ वाजता श्री देव कलेश्वर मंदिरातून श्री देव गावडोबा मंदिरामध्ये देव तरंग स्वारीचे आगमन,श्री दत्तजयंत्ती उत्सव होणारे हरीनाम, रात्री ८ वाजता गावराखा मंड ळाचे भजन (बुवा-हेमंत घाडी), ९ वाजता कलेश्वर मंडळाचे भजन (बुवा-मिहीर मेस्त्री), १० वाजता रवळनाथ मंडळाचे भजन (बुवा-मनिष मेस्त्री), ११ वाजता नवनाथ मंडळाचे भजन, १२ वाजता मांडेश्वर मंडळाचे भजन, १ वाजता सिध्दीविनायक मंडळाचे भजन, २ वाजता गावडोबा मंडळ (माड्याचीवाडी-खालचीवाडी ) चे भजन, ३ वाजता गावडोबा मंडळ (वरची-राईवाडी ) चे भजन, पहाटे ४ वाजता महापुरुष मंडळ (माड्याचीवाडी- मधलीवाडी) चे भजन, १४ रोजी सकाळी ८ वाजता श्रीं ची नित्य पूजा, अभिषेक, ९ वाजता दत्त महाराजांची प्रतिकात्मक पूजा, दत्त याग, श्री सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजता महाप्रसाद, श्री दत्तजयंत्ती उत्सव होणारे हरीनाम सायंकाळी ७ वाजता सादोबा मंडळाचे भजन (बुवा- सुधाकर परब), रात्री ८ वाजता कोलडोंगर मंडळाचे भजन (बुवा- संदिप मेस्त्री), ९ वाजता कलेश्वर मंडळाचे भजन (बुवा-विलास मेस्त्री), १० वाजता ओम शिवकृपा कला क्रिडा मंडळाचे भजन,११ वाजता मोरेश्वर मंडळाचे भजन, १२ वाजता गावडोबा मंडळाचे भजन, १ वाजता श्री गणेश मित्र मंडळाचे भजन, २ वाजता गावडोबा मंडळ (माड्याचीवाडी - वरचीवाडी) चे भजन, पहाटे ३ वाजता गावडोबा ब्राम्हण मंडळ (खालची-राईवाडी) चे भजन, ४ वाजता काकड आरती होणार आहे, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.