
सावंतवाडी : चालकाचा ताबा सुटून डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात कुडाळ-गोवेरी भगतवाडी येथील चालक जागीच ठार झाला. सिद्धेश सखाराम पालकर (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत प्रथमेश तेरसे (रा.कुडाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश हा आपल्या ताब्यातील डंपर घेऊन बांदा येथून कुडाळच्या दिशेने येत होता. यावेळी अचानक मळगाव ब्रीजवर काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची गाडी पलटी झाली आणि त्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस हवालदार महेश जाधव यांनी दिली.